भारतीय शिक्षण मंत्रालयाचा वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दावली आयोग (CSTT) 10 भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक संज्ञा विकसित करण्यासाठी काम करत आहे. जेणेकरून प्रादेशिक भाषांवरची पकड मजबूत होऊन त्यांचे शब्द सहज सापडतील आणि त्यांचा अधिकाधिक वापर करता येईल. यासाठी सरकार आता यासाठी 10 भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये शब्दकोष प्रकाशित करणार आहे.
संस्कृत, बोडो, संथाली, डोगरी, काश्मिरी, कोकणी, नेपाळी, मणिपुरी, सिंधी, मैथिली या भाषांचा भारताच्या आठव्या अनुसूचीमध्ये अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट असलेल्या 22 भाषांमध्ये समावेश आहे. मात्र तांत्रिक संकल्पना आणि वैज्ञानिक संज्ञा स्पष्ट करण्यासाठी शब्दकोषाच्या अभावामुळे, फारच कमी अभ्यास साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
सरकार हे वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दकोष तीन ते चार महिन्यांत प्रत्येक भाषेतील 5,000 शब्दांसह मूळ प्रकाशित करेल. हे डिजिटल स्वरूपात, कोणतेही शुल्क न घेता आणि शब्द शोधता येतील अशा स्वरूपात उपलब्ध असतील. प्रत्येक भाषेत या डिक्शनरीच्या 1,000-2,000 प्रती छापल्या जातील.
या 15 क्षेत्रांचा समावेश होणार
यामध्ये सिव्हीस आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरींग, पत्रकारिता, लोकप्रशासन, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, आयुर्वेद आणि गणित यासह 15 क्षेत्रांचा समावेश करण्यास प्राधान्य दिले आहे. यामुळे विद्यापीठ आणि मिडल आणि सिनियर अशा दोन्ही शाळांसाठी पाठ्यपुस्तके तयार करणे शक्य होणार आहे.
कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रंस टेस्ट (सीयूईटी), ज्वॉइंट एंट्रेस इक्झामिनेशन (जेईई) मेन आणि यूनिव्हर्सिटी ग्रांट कमीशन (यूजीसी)-नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट(नेट) जसेकी एन्ट्रंस इक्झामकरिता कंटेंट तयार करण्यासाठी या डिक्शनरीचा उपयोग राज्य शिक्षण मंडळं, विद्यापीठे, इंजिनियरींग कॉलेज आणि शनल टेस्टिंग एजन्सी यांना पुरवले जाईल.
1950 मध्ये 14 भाषांचा राष्ट्रीय भाषा यादीत समावेश करण्यात आला. बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली 2004 मध्ये, कोंकणी, मणिपुरी आणि सिंधी 1992 मध्ये आणि सिंधी 1967 मध्ये समावेश केला गेला.