Advertisement

2024 च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये असेल संपूर्ण 'महिला राज'

प्रजापत्र | Sunday, 07/05/2023
बातमी शेअर करा

वी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) कर्तव्य पथावर होणाऱ्या अधिकृत समारंभात संचलन तुकडी आणि बँड पथकातील सर्व सहभागी महिला असू शकतात. यासंबंधीच्या प्रस्तावावर अधिकारी काम करत आहेत. संरक्षण मंत्रालयातील (Ministry of Defence) सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये 2024 च्या परेडच्या योजनेवर तिन्ही सेना, विविध मंत्रालये आणि विभागांना कार्यालयीन पत्र पाठवले आहे.

 

 

सूत्रांनी सांगितले की, अशा प्रस्तावाचा विचार करण्यात आला असून फेब्रुवारीच्या सुरुवातीला संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक "डी-ब्रीफिंग बैठक" घेण्यात आली होती. निवेदनात म्हटले आहे की, विचारविनिमय केल्यानंतर पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येणाऱ्या परेडमधील तुकड्यांमध्ये (मार्चिंग आणि बँड), झांकी आणि इतर प्रदर्शनांमध्ये फक्त महिलाच सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला.

 

 

दरम्यान, गेल्या काही वर्षांत कर्तव्य पथावर महिला अधिकाऱ्यांनी वार्षिक परेडमध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या वर्षी 26 जानेवारी रोजी आयोजित 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताने आपले लष्करी सामर्थ्य आणि दोलायमान सांस्कृतिक वारसा प्रदर्शित केला. यामध्ये 'महिला शक्ती' ही प्रमुख थीम होती.

Advertisement

Advertisement