Advertisement

'नारायणा 'ला कुलूप, आता आम्ही भरलेल्या पैशांचे काय ?

प्रजापत्र | Sunday, 07/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि. ६ (प्रतिनिधी ) : शिक्षण विभागातील खाबुगिरीमुळे परवानगी नसतानाही 'नारायणा ' स्कुलच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश तर घेतले, मात्र सदर शाळेला सील ठोकण्यात आले आहे. त्यामुळे आता शाळा भरणार का ? आणि भरणार नसेल तर आम्ही भरलेल्या पैशांचे काय ? या चिंतेने पालक हैराण झाले आहेत.

 

 

हे ही वाचा - संस्थाचालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर विनापरवानगी चालणार्‍या ’नारायणा स्कूल’ला ठोकले सील

 

बीड धारातील 'नारायणा ' स्कुलचा वाद मागील वर्षीपासून चिघळत आहे. मागीलवर्षीच सदर शाळेला परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र शिक्षण विभागाने कुठलीच ठोस कारवाई केली नाही. परिणामी सदर शाळेने यावेशी अनेकांचे प्रवेश निश्चित केले असून मोठ्याप्रमाणावर पालकांनी त्यासाठी पैसे देखील भरले आहेत. आता पालकांनी पैसे भरून प्रवेश निश्चित केल्यानंतर प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी सदर शाळेला सील ठोकले आहे.

 

 

हे ही वाचा - कमी होईना शिक्षण विभागाचे 'नारायणा 'वरील प्रेम

 

 

मात्र आता ज्यांनी पैसे देऊन येथे प्रवेश घेतले आहेत, त्या पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. आता जर शाळा सुरूच होणार नसेल तर आमच्या पाल्यांच्या प्रवेशाचे काय ? आम्ही पाल्यांना इतरत्र प्रवेश द्यायचा का काय करायचे ? आता भरलेले पैसे तरी परत मिळणार का ? असे अनेक प्रश्न पालकांना भेडसावत आहेत. शिक्षण विभागाला जर या शाळेला परवानगी नाही हे माहित होते, तर शाळेने मोठठंमोठे होर्डिंग लावून जैवेळी प्रवेश सुरु केले तेव्हाच शिक्षण विभागाने कारवाई का केली नाही, आता पालकांनी भरलेले पैसे बुडले तर त्याची जबादारी कोणाची असे अनेक प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement