Advertisement

पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने वृध्दाचा मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 04/05/2023
बातमी शेअर करा

आष्टी -  बावी येथील वृद्धाचा पाय घसरून विहरित पडून मृत्यु झाल्याचे घटना आज (दि.०४) रोजी पहाटे ५च्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

           मयत कारभारी रामराव सोनवणे (वय-६८) रा.बावी हे पहाटे पाणी आणण्यासाठी गावातील सार्वजनिक विहिरीवर गेले होते. पाणी शेंदतांना त्यांचा तोल गेल्याने ते विहरीत पडले. बराच वेळ काराभारी सोनवणे घरी लवकर न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार विकास राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Advertisement

Advertisement