देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं मंगळवारी कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. अरुण गांधी हे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध लेखक होते.
अरुण गांधी यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.
अरुण गांधी हे मनिलाल गांधी आणि सुशिला मशरूवाला यांचे पुत्र होते. १४ एप्रिल १९३४ रोजी त्यांचा डर्बनमध्ये जन्म झाला होता. आपल्या आजोबांच्या अर्थात महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून अरुण गांधी यांनी सामाजिक क्षेत्रात मार्गक्रमण केलं.
बातमी शेअर करा