Advertisement

1 मे पासून इनकमिंग कॉल आणि SMSमध्ये होणार मोठे बदल

प्रजापत्र | Thursday, 27/04/2023
बातमी शेअर करा

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) 1 मे पासून काही नियम बदलणार आहे. नवीन नियमानुसार, TRAI एक नवीन फिल्टर आणणार आहे, ज्यामध्ये 1 मे नंतर फोनमध्ये बनावट कॉलिंग आणि एसएमएस येऊ शकणार नाहीत.

असे झाल्यास ग्राहकांना नको असलेले कॉल्स आणि मेसेज येणार नाहीत आणि त्यांना विनाकारण त्रास होणार नाही. याबाबत ट्रायने दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना आदेश जारी केले आहेत. टेलिकॉम कंपन्या 1 मे पासून फोन कॉल्स आणि एसएमएससाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्पॅम फिल्टर्स लागू करत आहेत.

हे फिल्टर फेक कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी काम करेल. त्यामुळे हे फेक कॉल आणि एसएमएस यूजर्सपर्यंत पोहोचणार नाहीत. टेलिकॉम कंपनी एअरटेलने एआय फिल्टर्स बसवण्याची सेवा सुरू केली आहे.

Jio देखील काही दिवसात हे फिल्टर लागू करू शकते. ट्रायच्या आदेशानंतर ही सेवा 1 मे 2023 पासून सुरू होईल, असे मानले जात आहे.

 

कॉल आयडी फीचर लवकरच येत आहे :

ट्राय अनेक दिवसांपासून बनावट कॉल आणि एसएमएस रोखण्यासाठी नियम बनवत आहे. या अंतर्गत TRAI 10 अंकी मोबाईल नंबरवरून प्रमोशन कॉल्स बंदी घालण्याची मागणी करत आहे. याशिवाय ट्राय कॉलर आयडी फीचर आणण्यावरही काम करत आहे.

यामध्ये फोन आल्यावर कॉल करणाऱ्याचा फोटो आणि नाव दिसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संदर्भात टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलशी बोलणी सुरू आहेत. गोपनीयतेमुळे हे फीचर आणण्यासाठी कंपन्या फारशा सकारात्मक नसल्याचे मानले जात आहे.

Advertisement

Advertisement