Advertisement

ऐन उन्हाळ्यात ‘विजे’चा लपंडाव

प्रजापत्र | Thursday, 27/04/2023
बातमी शेअर करा

निलेश गरुड

 

माजलगाव - शहरात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे.ऐन भर दुपारी उन्हाचा चटका वाढला असताना लाईट जाने, किरकोळ कामासाठी सारखी सारखी लाईट घालवणे असले प्रकार माजलगाव महावितरण करत असून विजेच्या या लपंडावाला शहरवासी अक्षरशा वैतागले आहेत.

 

एक विज बिल थकले तरी महावितरण कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना हैरान केले जाते. विज बिलात सर्व आकार, कर लावले जातात मग विज गेली किंवा त्यात बिघाड झाला तर त्याला पर्यायी व्यवस्था करून देण्याची जबाबदारी कुणाची आहे असा संतप्त सवाल नागरीक उपस्थित करत आहेत. सध्या माजलगाव शहरात विजेचा मोठा खेळ खंडोबा सुरु आहे. या ठिकाणी मोठी बाजार पेठ आहे. विजेवर चालणारी असंख्य यंत्रे आहेत. त्यावर अवलंबून अनेक व्यवसाय आहेत. मात्र विज गेल्यानंतर ही यंत्रे बंद पडतात आणि याचा मोठा फटका व्यवसायिक आणि दुकानदारांना बसतो.

 

सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यात लाईट नसल्या कारणाने नागरिकांचे हाल होत आहेत लाईट 10 मी.साठी येथे व 4 घंटे जाते असा खेळ येथील महावितरण करत आहे 

या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे हेही पाहणे गरजेचे आहे कारण नागरिकांकडून भरमसाठ वीज आकार घेऊन जर त्यांना चांगली सेवा मिळत नसेल तर यावर कारवाई करण्याची मागणीही अनेकजण करत आहेत.

Advertisement

Advertisement