Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर

प्रजापत्र | Tuesday, 25/04/2023
बातमी शेअर करा

 

 

मुंबई-सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी तीव्र झाल्यात. या गदारोळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुटीवर गेलेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. एकनाथ शिंदे सुटीवर का गेले, याची खुसखुशीत चर्चा सुरू आहे.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री असे सुटीवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे समजते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांच्या गावी ते देवदेव करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बोलून दाखवलेली उघड इच्छा, सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येण्याची शक्यता. या साऱ्या घडामोडीत मुख्यमंत्री सुटीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement

Advertisement