Advertisement

भारतीय सर्कसचे पितामह जेमिनी शंकरन यांचे निधन

प्रजापत्र | Tuesday, 25/04/2023
बातमी शेअर करा

कन्नूर - भारतीय सर्कसचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (वय ९९) यांचे रविवारी रात्री निधन झाले. शंकरन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर कन्नूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. जेमिनी शंकरन हे कलावंत असण्याबरोबरच जेमिनी व जम्बो सर्कसचे संस्थापक देखील होते.

देशातील सर्वात जुने सर्कस कलावंत म्हणून शंकरन यांची ओळख होती. त्यांनी देश विदेशात विविध ठिकाणी आपल्या कलांचे सादरीकरण केले. त्यांच्यावर मंगळवारी पय्यमबालम बिच येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement

Advertisement