इतरवेळी स्वच्छ चारित्र्याचा आव आणणारे, विरोधी पक्षातील लोकांवर काही आरोप झाले तर लगेच त्यांच्या राजीनाम्यासाठी आकाश पाताळ एक करणारे भाजपवाले जेव्हा त्यांच्या वर्तुळातील काही लोकांवर आरोप होतात, त्यावेळी मात्र शहामृगासारखे मान आक्रसून बसत असतात . असे अनुभव यापूर्वी देखील अनेकदा आले आहेत, आता कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या खा. ब्रिजभूषण यांच्याबाबतीत पुन्हा हाच अनुभव येत आहे.
खा. ब्रिजभूषण हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. भाजपचे खासदार असलेल्या या महोदयांवर ज्यांनी देशासाठी खेळामध्ये मोठे योगदान दिले त्याच कुस्तीगीरांनी , महिला कुस्तीपटूनि लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यापूर्वी ज्यावेळी हे आरोप झाले आणि कुस्तीगिरांना थेट आंदोलन करावे लागले त्यावेळी सरकारने एक समिती नेमून हे प्रकरण थंड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा थेट आरोप खेळाडूंनी केला आहे. याविरोधात खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली आहे. जे खेळाडू देशासाठी जीवाचे रान करतात, त्यांनी कुस्ती परिषदेच्या अध्यक्ष्यावर केलेले आरोप, त्यातही लैंगिक शोषणाचे आरोप देखील सत्ताधारी गांभीर्याने घेत नसतील, तर यांना नेमके काय अपेक्षित आहे ? हेच प्रकार जर विरोधी पक्षातील कोणत्या व्यक्तीकडून झाले असते तर आतापर्यंत देशातील तमाम भाजपेयीनीं सारा देश डोक्यावर घेतला असता.
मुळात खेळामध्ये राजकारण नको असते, मात्र भाजपने सर्वच क्षेत्रांचे राजकीयीकरण केले आहे. ब्रिजभूषण हे भाजप खासदार आहेत, आणि ते कुस्ती महासंघचे अध्यक्ष झाले म्हणून आम्ही असे म्हणत आहोत असे नाही, असे महासंग आणि परिषद अशाही राजकीय लोकांनीच व्यापून टाकल्या आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण अध्यक्ष असले म्हणजे फार काही वेगळे झालेले नाही, मात्र ब्रिजभूषण अद्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षातील लोक पदावर असलेल्या राज्यांच्या परिषद ज्या पद्धतीने बरखास्त करण्याचा सपाटा लावला यातूनच याचे झालेले राजकारण समोर येऊ शकते .
तर असेही अध्यक्ष,बरे यांच्यावर आरोप करणारे काही सामान्य खेळाडू नाहीत . विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आरोप करून आता एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विनेश फोगट आणि इतरांचे कुस्तीसाठी असलेले योगदान नाकारता येण्यासारखे नक्कीच नाही.मात्र तरीही ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे खेळाडूंचे संपूर्ण करिअर, त्यांचे कुटुंब आणि भविष्य आता धोक्यात आले आहे. तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. तसेच क्रीडा मंत्रालय त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये. अशी भावना आता खेळाडूंची झालेली आहे.
ब्रिज भूषण यांनी अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यांनी १२ वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे ते भाजपमध्ये मोदींचे अति लाडके आहेत, त्यामुळेच त्य्यांच्यावर कारवाई केली जात नाही. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर खेळाडूंचे म्हणणे पोलीस ऐकून घेणार नसतील, क्रीडा मंत्रालय ऐकून घेणार नसेल आणि त्यांना जर सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत असेल तर आपल्या यंत्रणा किती कोडग्या झाल्या आहेत