नामांतरावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादच नाव सरकारी दरबारी लावू नका, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ जूनला होणार आहे.
औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले होते. याला मोठा विरोध देखील झाला होता. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं. पण यावरून गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचेही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं करण्यात आलं आहे. याचे गॅझेट नोटीफिकेशन शासनानं काढले होते. मात्र मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्देशामुळे आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका
औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याला केंद्राने मंजुरी दिली. पण या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं २४ मार्चपर्यंत या नामांतराबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले होते.