अंबाजोगाई - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत, २० वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड.अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयाने गुरूवारी ठोठावली.विजय शंकर पौळ, रा. फुले नगर, केज.असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी विजय शंकर पौळ व पीडित मुलगी एकाच परिसरात रहात होते. त्यामुळे परस्परांमध्ये ओळख होती. याचाच फायदा घेत आरोपी याने अल्पवयीन पिडीत मुलगी ही तिच्या शाळेजवळ खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बाजुला बोलवून घेतले. व ओढत बंधा-याकडे नेले. तिथे तिचे तोंड दाबून खाली पाडले. व पिडीतेवर बळजबरीने आत्यचार केला. या घटनेची कुठे वाच्याता केलीस तर जिवे मारण्याची धमकी दिली.व निघून गेला. पीडित मुलीने या घटनेची माहिती तिच्या आईला दिली. आईने पोलीस ठाणे गाठले.व पोलिसात तक्रार नोंदविली. पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपी विजय शंकर पौळ याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक केली.या प्रकरणाचा तपास तत्कालीन पो. उपनिरीक्षक सिमाली कोळी यांनी केला.व आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयासमोर आले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण बा. फड यांनी काम पाहिले. तर या प्रकरणात पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.