राज्यात गुटखा बंदी असतानाही सर्रास गुटखा मिळत असल्याने यावर पायबंद घालण्यासाठी तसेच गावागावात जारचे थंड पाणी विकण्याचे धंदे जोरदार सुरू आहेत. या जार द्वारे पाणी विकणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.
राज्यात गुटखा बंदी असूनही सर्रास पाहिजे तो गुटखा मिळतो. गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली असून, यातून फक्त शासनाचा महसूल बुडाला या व्यतिरिक्त काहीच झालेले नाही. यामुळे शासनाने गुटखा संबंधित एक म्हत्वाचा निर्णय घेतला असून गुटख्याची वाहतूक करणारी वाहने जप्त केल्यानंतर ती वाहने शासनाकडे जमा करण्याचा निर्णय झाला. तसेच गावागावात जारचे पाणी विक्रीचा धंदा जोरदार सुरू आहे. परंतु यावर सततच प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसून, फिल्टर आणलं अन् पाणी थंड केलं की, झाले. यामुळे स्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण होते की, नाही हे त्या जार विक्रेत्यांनाच माहीत. परंतु यावरही आता अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण येणार आहे. यापुढे जार द्वारे पाणी विकणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे. यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी एक बैठक घेऊन आदेश दिले.