Advertisement

धारुर तालुक्यात शेतकरी आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 20/04/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.२० -  धारुर तालुक्यात शेतकरी आत्महत्येची ( Farmer suicide ) घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील रेपेवाडी येथील अल्पभुधारक शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेतला.
( Farmer suicide in Dharur taluka.)

 

 

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच असुन आज धारुर तालुक्यात एका शेतकऱ्यांने आपली जीवन यात्रा संपवली. धारुर ( Dharur) तालुक्यातील रेपेवाडी येथील शंकर प्रभाकर शेंडगे (वय 52) या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. सदर शेतकऱ्यांस 5 एकर कोरडवाहू शेती असून स्टेट बँकेचे कर्ज असल्याचे कळते. मयत शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगा,  एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट दिली. प्रेत शवविच्छेदनासाठी धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement