Advertisement

आष्टी तालुक्यात दोन महिलांचा वीज पडून दुर्देवी मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 19/04/2023
बातमी शेअर करा

आष्टी - आष्टी तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडासह वादळ सुरू होऊन काही ठिकाणी पाऊस पडला असून यामध्ये सौ. काजल विकास माळी (वय -२३) रा.केरुळ व सौ. राणी (ताई) संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय ३५) ह्या माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत,पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी, तसेच शिरुर का. तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आष्टी तालुक्यात दि.१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सर्वदूर जोरदार वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस झाला असता मध्ये दुर्दैवी घटनेत सौ. काजल विकास माळी (वय -२३) रा.केरुळ व सौ. राणी (ताई) संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी (वय ३५) ह्या माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत,पारगाव जो. येथील युवराज नवनाथ भोराडे यांची बैलजोडी, तसेच शिरुर का. तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

 

पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांनो काळजी घ्या - आ.सुरेश धस

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार मतदार संघातील नागरिकांना विनंती आहे, की पुढील दोन दिवस पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खाते व पंजाबराव डख यांनी सांगितली आहे, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता वातावरण खूप खराब असून वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस येण्याची, विज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व बांधवांनी आपली स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.तरी या कालावधीत आपली जनावरे झाडाखाली बांधू नयेत, तसेच शेतामध्ये काम करताना पावसाचे चिन्ह दिसताच सुरक्षित ठिकाणी जावे अशी विनंती आहे.मयतांना नैसर्गिक आपत्ती मदतनिधी मिळावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement