Advertisement

इन्स्टाग्रामने युझर्ससाठी आणले नवे फीचर

प्रजापत्र | Wednesday, 19/04/2023
बातमी शेअर करा

इन्स्टाग्राम युझर्सना त्यांच्या बायोत आता 5 लिंक अ‍ॅड करता येणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. याआधी युझर्सना बायोमध्ये केवळ एकच लिंक अ‍ॅड करता येत होती.

तथापि, या फीचरशिवायही अनेक युझर्स थर्ड पार्टी सर्व्हिस लिंकट्रीच्या माध्यमातून एकापेक्षा जास्त लिंक बायोत अ‍ॅड करत असतात. लिंकट्रीकडून युझर्सना अनेक युआरएल लिंकसह वेबपेज बनवण्याचा पर्याय पुरवला जातो. यानंतर ते वेबपेज लिंक इन्स्टाग्राम बायोत अ‍ॅड करतात.

इन्स्टाग्राममध्येच दिसतील सर्व 5 लिंक

लिंकट्रीच्या माध्यमातून बायोत अ‍ॅड केलेल्या सर्व लिंक इन्स्टाग्रामवर दिसत नाही. मात्र या नव्या फीचरमुळे आता सर्व 5 लिंक इन्स्टाग्राममध्ये दिसतील. प्रोफाइल व्हिजिटरला एका लिंकसह ऑदर्स असा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यावर व्हिजिटरला तुम्ही अ‍ॅड केलेल्या सर्व लिंक दिसतील.

बायोत काय असते

बायोला आपण इंट्रॉडक्शन लाइन म्हणू शकतो. याद्वारे तुम्ही तुमच्या प्रोफाइलबद्दल सांगतात. प्रत्येकाचा एक इंट्रो असतो. ज्याद्वारे आपण स्वतःला इंट्रोड्यूस करतो. तसेच बायोच्या माध्यमातून प्रोफाइल व्हिजिटरला प्रोफाइलची ओळख करून दिली जाते.

 

 

इन्स्टाग्राम बायो लिंक शेअर करण्याचे फायदे

 

तुम्ही मल्टीपल सोशल मीडिया अकाऊंट अ‍ॅड करू शकता

तुम्ही तुमची वेबसाइट, यूट्यूब चॅनल प्रोमोट करू शकता

तुम्ही स्वतःचा किंवा दुसऱ्याचा एनजीओ, व्यवसाय प्रोमोट करू शकता

इन्स्टाग्रामने अलिकडेच क्रॉस प्लॅटफॉर्म शेअरिंग सर्व्हिसही इनेबल केली आहे. यानंतर आता इन्स्टाग्राम युझर्स आपल्या रील्स आणि पोस्ट थेट व्हाटसअ‍ॅपसह दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकतील.

Advertisement

Advertisement