माजलगाव: दि.१८ झेंडा चौक भागातील रंगार गल्लीतील व्यंकटेश सचिनराव कोंडावार ( वय १६) या मुलाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायी व धक्कादायक घटना घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील झेंडा चौक भागातील रंगार गल्लीत राहणारा व्यंकटेश सचिनराव कोंडावार हा येथील महाविद्यालयात ११ वी मध्ये शिक्षण घेत होता.आज सकाळी बांधकामावर पाणी मारण्यासाठी विजेची मोटर सुरू करताना त्यास विजेचा जबर शॉक लागला. यातच त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
बातमी शेअर करा