Advertisement

भारतातील पहिले अ‌ॅपल स्टोअर मुंबईत उघडले

प्रजापत्र | Tuesday, 18/04/2023
बातमी शेअर करा

भारतात प्रथमच टेक कंपनी अ‌ॅपलचे स्टोअर मुंबईत उघडले आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी आज ( 18 एप्रिल) सकाळी 11 वाजता मुंबईत कंपनीच्या पहिल्या फ्लॅगशिप रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये हे स्टोअर सुरू झाले. दुसरे स्टोअर 20 एप्रिल रोजी दिल्लीच्या साकेत येथे उघडले जाणार आहे.

 

 

परंतू आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, अ‌ॅपलचे अनेक स्टोअर्स भारतात आधीच आहेत, यात नवीन काय? वास्तविक, सध्या अ‌ॅपलची उत्पादने विक्री करणारे सर्व दुकाने कंपनीचे प्रीमियम विक्रेते आहेत.प्रीमियम पुनर्विक्रेते म्हणजेच थर्ड पार्टी ज्यांनी डिव्हाइस विकण्यासाठी अ‌ॅपलकडून परवाना प्राप्त केला आहे.

 

 

अ‌ॅपलच्या अधिकृत आणि थर्ड पार्टी स्टोअरमधील सर्वात मोठा फरक म्हणजे ग्राहकांना मिळणारा वेगळा अनुभव. अधिकृत रिटेल स्टोअर्स त्यांच्या प्रीमियम ग्राहक अनुभवासाठी जगभरात ओळखले जातात. याशिवाय या स्टोअरचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. अशा परिस्थितीत आम्ही या स्टोअर्सशी संबंधित 5 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

 

 

सर्वप्रथम Apple BKC स्टोअरबद्दल जाणून घेऊया....
अ‌ॅपलच्या मुंबई आउटलेटला Apple BKC असे नाव देण्यात आले आहे. हे मुंबईतील वांद्रे कुर्ला भागातील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आहे. मुंबई सेंट्रलपासून त्याचे अंतर सुमारे 14 किलोमीटर आहे. स्टोअरची रचना शहरातील प्रतिष्ठित 'काळी-पिवळी' टॅक्सीपासून प्रेरित आहे. त्याचे मंथली भाडे 42 लाख रुपये आहे. दर तीन महिन्यांनी भाडे दिले जाणार आहे.

 

अ‌ॅपल स्टोअर विषयी खास 5 गोष्टी
सुपर लार्ज स्टोअर
: अधिकृत स्टोअर्स खूप मोठे आहेत. त्यात गर्दी असली तरी कोणतेही प्रोडक्ट पाहण्यासाठी थोडा वेळ थांबावे लागत नाही.
युनिक डिझाइन : अ‌ॅपल स्टोअरमध्ये एक अद्वितीय डिझाइन आहे. मुंबई स्टोअरची रचना शहरातील काळ्या आणि पिवळ्या टॅक्सीपासून प्रेरित आहे. न्यूयॉर्क स्टोअर क्यूब शेपचे आहे.

त्वरीत बिलिंग : उत्पादन खरेदी केल्यानंतर बिलिंगसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. Apple Store कर्मचारी बिलिंगसाठी मोबाइल पेमेंट टर्मिनल पद्धत वापरतील.

डिव्हाइस कॉन्फिग : तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॅकबुक किंवा iMac सारखी उत्पादने कॉन्फिगर करू शकता. या प्रकारची सेवा रिटेलरकडे उपलब्ध नाही.
उत्तम ट्रेंड इन व्हल्यू : ही दुकाने चांगल्या विनिमय मूल्यासाठी ओळखली जातात. सामान्यतः येथे व्यापार मूल्य Amazon-Flickart सारख्या प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त असते.

 

 

आता या स्टोअर्सशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे…

1. अ‌ॅपल उत्पादने स्वस्त होतील?
अ‌ॅपल स्टोअरवरील किमती सामान्यतः जिओ मार्ट, Croma आणि Amazon सारख्या प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त असतात. होय. हे नक्कीच आहे की, अॅपलकडून काही विशेष सवलत दिली जात असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे उत्पादन स्वस्त मिळण्याची शाश्वती नाही.

 

2. उत्पादनाच्या उपलब्धतेची समस्या दूर होईल का?
अ‌ॅपलच्या स्टोअर्समध्ये मोठी यादी आहे. सर्व प्रकारची उत्पादने आणि रंग बहुतेक वेळा स्टॉकमध्ये उपलब्ध असतात. जर एखाद्या ग्राहकाला iMac सारखे उत्पादन स्वतःच्या आवडीनुसार कॉन्फिगर करायचे असेल तर तो ते करू शकतो. अ‌ॅपल स्टोअर्समध्ये डेमो आणि खरेदीसाठी उपलब्ध उपकरणांची श्रेणी मोठी आहे.

 

3. प्रोडक्ट सर्व्हिसिंगला लागेल कमी वेळ?
आत्तापर्यंत, Apple ची Apple ची सेवा केंद्रे देशातील तृतीय पक्षांमार्फत त्याच्या स्टोअर्समधून स्वतंत्रपणे चालवली जात होती. आता ग्राहकांना इन-स्टोअर सर्व्हिसिंग सुविधा मिळणार आहे. त्याला 'जीनियस बे' म्हणतात. त्यामुळे सुटे भाग न मिळाल्याने होणाऱ्या विलंबाची समस्या दूर होईल. प्रशिक्षित व्यावसायिकांकडूनही सेवा दिली जाईल. डिव्हाइसेस सेट करणे आणि Apple ID पुनर्प्राप्त करण्यापासून सदस्यता आणि बिलिंगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करेल. शारीरिक नुकसान झाल्यास, यंत्रामध्ये काय आवश्यक आहे आणि ते वॉरंटी अंतर्गत आहे की अ‌ॅपल केअरद्वारे संरक्षित आहे, हे तज्ज् पाहतील.

 

4. मी ऑनलाइन ऑर्डर करू शकतो का?
अ‌ॅपलने 2020 मध्ये ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी भारतात आपली सेवा सुरू केली. म्हणजेच, कोणतेही उपकरण ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते. मात्र, आता ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर स्टोअरमधून उत्पादन घेण्याचाही पर्याय उपलब्ध असेल.

 

 

5. अधिकृत स्टोअर आणि रिटेलर यांच्यात काय फरक आहे?
सध्या भारतात अॅपल उत्पादने विकणारी सर्व दुकाने कंपनीचे प्रीमियम रिटेलर आहेत. प्रीमियम रिटेलर म्हणजे थर्ड पार्टी स्टोअरचा संदर्भ देतात. ज्यांनी डिव्हाइस विकण्यासाठी Apple कडून परवाना प्राप्त केला आहे. मुंबईत उघडलेले स्टोअर अॅपलचे स्वतःचे स्टोअर आहे. अधिकृत रिटेल स्टोअर्स त्यांच्या प्रीमियम ग्राहकांच्या अनुभवासाठी जगभरात ओळखले जातात.

 

 

स्टोअर लॉन्चसाठी टीम कुक भारतात
अ‌ॅपलचे सीईओ टिम कुक हे स्टोअर लॉन्च करण्यासाठी भारतात आले आहेत. सोमवारी मुंबईत पोहोचताच त्यांनी ट्विट केले- 'हॅलो, मुंबई! नवीन Apple BKC स्टोअरमध्ये आमच्या ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही. ट्विट केलेल्या फोटोमध्ये टीम कुकसोबत मुंबई स्टोअरचे कर्मचारी दिसत आहेत.

 

 

टीमने अंबानी आणि चंद्रशेखरन यांची घेतली भेट
रिपोर्ट्सनुसार, टीम कुक यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांची भेट घेतली. टीम कुकने मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा यांची अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

 

.

टीम कुकने माधुरीसोबत वडा पाव खाल्ला
टीम कूकने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांचीही भेट घेतली. या भेटीचा एक फोटो माधुरीने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये टीम कुक आणि माधुरी दीक्षित रेस्टॉरंटमध्ये वडा पाव खाताना दिसत आहेत. टिम कूकने फोटो रिट्विट करून लिहिले, 'मला पहिल्या वडा पावाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद माधुरी दीक्षित- ते स्वादिष्ट होते.'

 

 

टीम कुक पंतप्रधान मोदींनाही भेटू शकतात
वृत्तानुसार, Apple Store लाँच केल्यानंतर टिम कुक बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेऊ शकतात. याशिवाय ते निर्यात आणि उत्पादन यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवरही मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

Advertisement

Advertisement