Advertisement

अजित पवारांनी सोशल मीडियावरील 'राष्ट्रवादी'चे नाव चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला

प्रजापत्र | Tuesday, 18/04/2023
बातमी शेअर करा

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या अफवा असल्याचे म्हणत स्वतः अजित पवार, शरद पवार आणि महाविकास आघाडीतून जोरदार खंडन सुरू आहे. असे संशयाचे चित्र असताना आज अजित पवार यांनी सोशल मीडियावरील पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला. त्यामुळे हे धुके गडद झाले आहे.

 

 

शरद पवार यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार नाराज नाहीत. ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर दुसरीकडे हे वॉलपेपर दीड वर्षापूर्वी हटवल्याचा दावा अजित पवारांनी केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र, तरीही अजित दादांच्या नाराजीची चर्चा काही थांबताना दिसत नाही.

 

 

नेमके झाले काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बातम्या अफवा असल्याचे सांगत स्वतः अजित पवारांपासून ते शरद पवारांपर्यंत सारेच जण खंडन करत आहेत. मात्र, तसे कृत्य होताना दिसत नाही. कारण अजित पवार यांनी कालचे कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. मात्र, असे कार्यक्रम नव्हते, असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला. त्यानंतर आता सोशल मीडियावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले वॉलपेपर हटवलेत. त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

 

 

फेसबुक वॉलपेपर
अजित पवार यांच्या फेसबुक पेज खा
त्याचे वॉलपेपर कोरे आहे. त्या खात्याच्या एंट्रोमध्ये विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा उल्लेख आहे. आज या पेजवर दोन फेसबुक पोस्ट केल्यात. त्यातली एका पोस्टमध्ये 'भारतमातेच्या रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक, थोर सेनानी तात्या टोपे यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!' असा उल्लेख करून तात्या टोपे यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये महर्षी धोंडे केशव कर्वे यांना अभिवादन केले आहे. त्यात 'महिलांचे शिक्षण आणि त्यांचे हक्क व विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घालणारे थोर समाजसुधारक, 'भारतरत्न' महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!' म्हटले आहे. या पोस्टच्या फोटोवरही राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आहे.

 

 

ट्विटर वॉलपेपर
अजित पवार यांच्या ट्विटर हँडलवरही विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा परिचय आहे. सोबतच फेसबुकवर टाकलेल्याच दोन्ही पोस्ट आहेत. या फोटोवर पक्षाचे चिन्ह आहे. मात्र, ट्विटरच्या पेजवरही पक्षाचे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर नाही. त्यामुळे अजित पवार खरेच नाराज आहेत का? नसतील तर मग पक्षाचे चिन्ह आणि नाव असलेला वॉलपेपर दोन्ही अकाउंटवर का नाही? अशी चर्चा सुरूय.

Advertisement

Advertisement