Advertisement

आष्टीत गारांचा पाऊस

प्रजापत्र | Saturday, 15/04/2023
बातमी शेअर करा

प्रविण पोकळे
आष्टी-तालुक्यातील अरणविहीरा येथे शनिवारी (दि.१५) गारांचा पाऊस पडल्याने  शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.फळबागांना या गारपिठीचा मोठा फटका बसला असलयाचे चित्र पाहायला मिळते. 

 


   

गेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन,दुपारी ढग दाटून येत असून सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट होत आहे.तालुक्यातील मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने हवालदिल असलेला शेतकरी आणखीन संकटात सापडला असून शनिवारी दुपारी अरणविहिरा परिसरात झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.या भागात हिमाचल प्रदेशात जशी बर्फ वृष्टी होती त्याप्रमाणे सगळीकडे गारपीट झालेली पाहायला मिळत होती.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 


 

Advertisement

Advertisement