दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर जाहीर केलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नाराजी वाढली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते देखील नाराज होते. दरम्यान ही नाराजी दुरू झाल्याची चर्चा आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. देशात एकता ठेवायची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही एकत्र होऊन लढण्यास तयार आहोत. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्र होऊन लढणार. देशातील अनेक विरोधी नेत्यांशी आम्ही संवाद साधणार आहोत. हाच विचार शरद पवार यांचा आहे.हीच आज चर्चा झाली आहे.शरद पवार म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले तेच विचार आमचे सर्वांचे आहेत. विचारधारा सारख्या असणाऱ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही तर सुरूवात आहे.ममताजी, केजरीवाल यांच्याशी देखील आम्ही संवाद साधणार आहोत. त्यांना एकत्र येण्यासाठी विनंती करणार आहोत