बीड दि.१३ (प्रतिनिधी)-येथील भगवान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका महिलेच्या पोटातून अंडाशयाचा चार किलोचा गोळा काढण्यात डॉक्टर माधव सानप यांना यश आले आहे.गुरुवारी (दि.१३)सायंकाळी ही शस्त्रक्रिया पार पडली.
बीड शहरातील संगीता डावकर (वय-४६)ही महिला गुरुवारी सायंकाळी ७ वाजता पोटदुखीच्या वेदना घेऊन
भगवान हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. यावेळी
डॉक्टरांनी तपासणी करून रुग्ण महिलेस भरती केले. सोनोग्राफी तपासणीमध्ये सदर महिलेच्या पोटात मोठी अंडाशयाची गाठ असल्याचे निदानातूनसमोर आले होते. त्यामुळे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर माधव सानप, भूलतज्ञ रमेश जाधव, डॉ. जगदीश कंठाळे, तेजमल राऊत आणि रागिणी सिस्टर यांनी महिलेच्या पोटातून चार किलोचा गोळा शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. दीड तास चालल्या या शास्त्रक्रियेमुळे महिलेला जीवदान मिळाले असून ती गाठ तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आली आहे. दरम्यान डॉक्टरांच्या तत्परतेमुळे सदर महिलेला जीवदान मिळाले आहे.