आयपीएल 2023 मध्ये आज 18 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आपला मागचा सामना गमावल्यामुळे आज ते विजयासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. गेल्या सामन्यात गुजरातला रिंकू सिंहच्या धडाकेबाज खेळीमुळे केकेआरकडून शेवटच्या षटकात मात खावी लागली होती. तर दुसरीकडे होम ग्राऊंडवर खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 8 विकेट्स राखून पराभव केला होता. या सामन्यात शिखर धवनने दमदार 99 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली होती.
आज पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघ आपली गाडी पुन्हा विजयी ट्रॅकवर आणण्याच्या प्रयत्नात असतील. आजच्या सामन्यात दोन्ही संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सच्या संघात कर्णधार हार्दिक पांड्याची एन्ट्री होऊ शकते. तसेच रिंकू सिंहकडून सडकून मार खाणाऱ्या यश दयालचा देखी पत्ता कट होऊ शकतो.
दुसरीकडे पंजाब किंग्जच्या संघात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि मॅच फिनिशर लिम लिव्हिंगस्टोनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे पंजाबची मधली फळी अजून मजबूत होईल. गुजरात आणि पंजाब यांच्यातील हेड टू हेड सामन्यांची आकडेवारी पाहिली तर या दोन्ही संघांनी एकमेकांविरूद्ध 2 सामने खेळले आहेत. त्यातील एक सामना पंजाबने तर दुसरा सामना गुजरातने जिंकला आहे.
गुजरातची संभावित प्लेईंग 11 :
शुभमन गिल, वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, यश दयाल
इम्पॅक्ट प्लेअर : जयंत यादव, शिवम मावी, मॅथ्यू वेड, जोशुआ लिटिल, ओडियन स्मिथ
पंजाब किंग्ज संभावित प्लेईंग 11 :
शिखर धवन, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा, शाहरूख खान, सॅम करन, नाथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, कगिसो रबाडा, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर : सिकंदर रजा, ऋषी धवन, लिम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी