वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट (नीट) परीक्षेचे आयोजन केले आहे. मे महिन्यात नियोजित असलेल्या या परीक्षेच्या नोंदणीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे वाढीव मुदत दिलेली आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (ता.१३) पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.
एमबीबीएस, बीडीएस, फिजिओथेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसह अन्य वैद्यकीय शाखांतील पदवी अभ्यासक्रम व बी.एस्सी. (नर्सिंग) आदी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट २०२३ ही परीक्षा घेतली जाणार आहे.
देश व विदेशातील ४९९ परीक्षा केंद्रांवर येत्या ७ मेस होणार असलेल्या या परीक्षेसाठी यापूर्वीच नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आलेले आहे. परंतु कुठलाही विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी पुन्हा एकदा नोंदणीची संधी एनटीएच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे.