बीड: महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे बदली आदेश अखेर राज्य शासनाने काढले आहेत. यात सर्वच महसूल विभागातून बदल्या करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील दोन उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून जिल्हयात नव्याने मात्र कोणालाच नियुक्ती देण्यात आलेली नाही.
बीडचे उपविभागीय अधिकारी म्हणून चमकदार कामगिरी केलेले आणि संयमी अधिकारी म्हणून परिचित असलेले नामदेव टिळेकर यांची उपविभागीय अधिकारी माळशिरस जि. सोलापूर येथे तर बीडचे विशेष भू संपादन अधिकारी (लपा) मच्छिंद्र सुकटे यांची निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर बदली झाली आहे.
बीडमध्ये यापुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले व सध्या हिंगोली येथे कार्यरत असलेले चंद्रकांत सुर्यवंशी यांची बदली रत्नागिरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
---
वादग्रस्त प्रकाश पाटील गोंदियाला
बीड जिल्हयात देवस्थान जमीन घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेले, त्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर निलंबित करण्यात आलेले बीडचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रकाश पाटील यांची बदली गोंदिया येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
---
प्रजापत्र | Wednesday, 12/04/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा