Advertisement

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा, दोघे पकडले, दोन फरार

प्रजापत्र | Monday, 10/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - सध्या आयएपील क्रिकेट सामने सुरू असुन सटट् बाजांचा सुळसुळाट आहे. शहरातील एका घरामध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून बीडच्या सायबर पोलिसांनी धडक कारवाई करत छापा मारून दोघांना ताब्यात घेतले असुन पाच लाख 63 हजार पाच रूपयांचा मुद्देमाल (ता. 9) रविवारी रात्री सात वाजता जप्त केला आहे.

 

पोलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील आंबेडकर चौकातील तुषार भुतडा यांचे घरामध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स विरूध्द गुजरात टायटन्स लाईव्ह सामन्यावर क्रिकेट माझा 11 या अॅपचा वापर भाव ठरवण्यासाठी करून मोबाईल फोन पे, गुगल पे वर पैसे स्विकारून वरिल मोबाईलवर पैसे लावुन क्रिकेट सट्टा (बेटींग/जुगार) खेळतांना खेळवित असतांना मुन्ना शेख इसाक शेख वय 30 वर्षे रा. आयशानगर, मुनीर शिकुर कुरेशी वय 52 वर्षे रा. खाटीकगल्ली, जहीर शेख रा. गांधनपुरा, (सट्टा बुकी मालक) (फरार) युनुस बापुजी शेख रा. गांधनपुरा,(सट्टा बुकी मालक) (फरार)यापैकी दोघांना पकडले असुन रूममध्ये सट्टा जुगाराचे साहित्य मिळुन आले असुन यामध्ये नउ मोबाईल, तीन मोडेम, तीन मोटारसायकल (दोन बुलेट, एक युनिकॉर्न) एक बनप्लस कंपनीची एलईडी टीव्ही, एक होमथिअटर, दोन कुल्कुलेटर, रजिस्टर, लेखा - जोखाचे तिन कागद, नगदी बारा हजार पाचशे असा एकुण पाच लाख 63 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन वरिल पाच जणांविरूध्द पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट् जुगार कायद्याप्रमाणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवि सानप, पालिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, बप्पासाहेब दराडे, श्री. जायभाये, अनिल डोंगरे, विजय घोडके, अन्वर शेख, पंचम वडमारे, प्रदिपकुमार वायभट या सायबर पोलिस ठाणे बीड यांनी कारवाई केली आहे.

Advertisement

Advertisement