अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय महाविद्यालयातील लिपिकास ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
अशोक अच्युतराव नाईकवाडे (वय 42, रा. जोगेश्वरी कॉलनी, चनई, ता. अंबाजोगाई) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराचे मयत सासरे यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर तक्रारदार यांचे पत्नीचा नोकरीत नियुक्ती करण्याचा प्रस्ताव सादर करून नियुक्ती ऑर्डर काढून देण्यासाठी नाईकवाडे यांनी स्वतः पंच साक्षीदार समक्ष ८० हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती ३७ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून स्वामी रामानंद तीर्थवैद्यकीय महाविद्यालयाचे गेटसमोरील हॉटेलमध्ये लाच रक्कम स्वीकारली असता रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली. सोबत पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश म्हेत्रे हे उपस्थित होते.