आष्टी-जिल्हयात दारू दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी परवानगी दिली नसताना ही आष्टीत सोमवारी (दि.4) तळीराम रस्त्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळेल.लॉकडाऊनमध्ये तळीरामांना दारू उपलब्ध होत असताना पोलीस प्रशासनाचे याकडे तर दुर्लक्ष होतच होते मात्र आता तर चक्क तळीराम टली होऊन रस्त्यावर पडले असताना त्यांना कोणी सांगायला तयार नाहीत.
आष्टीत पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे लॉकडाऊन काळातही दारू विक्री चालूच आहे. बारवाले तेजीत असल्याने तळीराम भरदुपारी रस्त्यावर मद्य प्राशन करून पडत आहेत.यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी जनतेतून मागणी होत आहे. दुप्पट भावाने,देशी,विदेशी दारूची विक्री काही दुकानातुन होत आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच तळीरामाची संख्या वाढत आहे. आष्टी खडकत रस्त्यावर भरदुपारी पडलेल्या या तळीरामाची चर्चा शहरभर मोठ्या प्रमाणावर सुरु होती.
बातमी शेअर करा
Leave a comment