अमेरिकेतील हिंडेनबर्ग या फर्म कंपनीने एक रिपोर्ट जाहीर केले होते. या रिपोर्टमध्ये हिंडेनबर्ग कंपनीने भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावण्यात आले होते. याविषयावरून संसदेतही घमासान घडून आला. अदाणींच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. अदाणी यांना लक्ष्य केले जात आहे, असे पवार म्हणाले होते.
काँग्रेस पक्ष अदानी प्रकरणावरून काँग्रेसने मोर्चा उघडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना, शरद पवारांच्या या प्रकरणी वेगळी भूमिका घेतल्याने, यावर चर्चा होत आहे. दरम्यान आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"शरद पवार हे आमचे शीर्षस्थ नेते आहेत. त्यांनी जी भूमिका मांडली आहे, आता त्यानंतर आम्ही यावर भाष्य करू शकत नाही. त्यांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका असते, "असं वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
काय म्हणाले होते शरद पवार?
हिंडेनबर्ग प्रकरणी विरोधीपक्षांनी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही अनावश्यक असल्याचे शरद पवार यांनी म्हंटले होते. जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीत सत्ताधारी पक्षाचेच नेहमी बहुमत राहिले आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे, ते बाहेर येणार नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाडूनच ते सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे, असेही पवार म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी, असे मत व्यक्त केले आहे.