Advertisement

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

प्रजापत्र | Saturday, 08/04/2023
बातमी शेअर करा

मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा आज (८ एप्रिल) १२वा सामना आज संध्याकाळी ७:३० पासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात आयपीएलचे दोन चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) आमनेसामने असणार आहेत. या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा गोलंदाज आता जखमी झाला आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागू शकते. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

 

मुंबई इंडियन्सला मोठा झटका
IPL 2023 मध्ये जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर, मुंबई इंडियन्सला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर संघाच्या आणि चाहत्यांच्या खूप आशा आहेत. मात्र चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरला दुखापत झाली आहे. माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, नेट सत्रादरम्यान जोफ्रा आर्चरच्या कोपरला चेंडू लागला, त्यामुळे तो आगामी सामन्यातून बाहेर जाऊ शकतो.

२०१९ मध्ये जोफ्रा आर्चरचा समावेश इंग्लंडला विश्वचषक जिंकणाऱ्या संघात करण्यात आला होता. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. अशा स्थितीत जोफ्रा आर्चरची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. त्याने आयपीएलमध्ये ३६ सामन्यात ४६ विकेट घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी रेट ७ च्या आसपास आहे. जोफ्रा आर्चरच्या एकूण टी-२० विक्रमावर नजर टाकली तर त्याने १२८ डावात १६७ विकेट घेतल्या आहेत. १८ धावांत ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार?
जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाल्याने संघाला एका अतिरिक्त गोलंदाजांची आवश्यकता भासणार आहे. अशावेळी मास्टर ब्लास्टर सचिनचा लेक अष्टपैलू खेळी करणारा अर्जुन तेंडुलकरचा त्याच्या जागी संघात विचार केला जाऊ शकतो. तो एक डावखुरा वेगवान गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. तो गेले तीन सीझन मुंबई इंडियन्ससोबत आहे पण अद्याप त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे आर्चरच्या जागी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement