बीड : राज्य विधानपरिषदेच्या ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा विजय जनतेचा असून सर्वसामान्यांनी महाविकास आघाडीला स्वीकारल्याचे द्योतक असल्याचे म्हटले आहे.
काय आहे ६ मतदारसंघातील चित्र
http://www.prajapatra.com/728
“धुळे, नंदुरबार निर्णय हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वीपासून होता. त्याचा विजय नव्हे, तो खरा विजय नाही. गेलं वर्षभर आम्ही काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती. ती कॉग्रेसने जिंकली. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केले. त्याचे यश असून पुणे मतदार संघात ही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आला आहे. महाराष्ट्रतील चित्र बदललं आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.“भाजपा प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे. मागच्या वेळेस विधान परिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले ते सर्वांना माहित आहे. तसेच पुणे शहरातील त्यांच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला,” असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
विधान परिषद निकालाचे प्रजापत्र चे कार्यकारी संपादक संजय मालाणी यांनी केलेले विश्लेषण.