Advertisement

'ड्रीम इलेव्हन' बंद होणार?

प्रजापत्र | Friday, 07/04/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगमधील बेकायदेशीर सट्टेबाजीवर बंदी घालण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित जाहिराती न दाखवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयटी आणि दळणवळण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली.

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आजपासून सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाईल. ते म्हणाले की, जे ऑनलाइन गेम जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत, किंवा त्यावरून वापरकर्त्यांचे नुकसान होणार असेल आणि ज्यामुळे व्यसनाधीनता वाढत असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते ऍप भारतात उपलब्ध होणार नाही.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नियमात अशी तरतूद करण्यात आली आहे की गेममध्ये ऑनलाइन सट्टेबाजी किंवा सट्टेबाजीची कोणताही घटक उपलब्ध असेल, तर तो गेम इंडियामध्ये उपलब्ध नसेल. त्याला परवानगी दिली जाणार नाही. याबाबत आम्ही संबंधितांशी चर्चा करूनच आयटी नियमांमध्ये सुधारणा केल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं.
एकंदरीतच, ड्रीम इलेव्हन, माय सर्कल ११, रमी ऍप, या सारखे ऍब बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप स्पष्ट काही सांगण्यात आलं नाही, मात्र सट्टेबाजी होणारे ऍप बंद होणार हे निश्चित झाले आहे.

Advertisement

Advertisement