आष्टी - टेम्पो चालकाचा ताबा सुटुन आठवडी बाजार घेऊन गावाकडे जाण्यासाठी थांबलेल्या तरूणाच्या अंगावरून टेम्पो गेल्याने यात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात आज पहाटे मुत्यू झाल्याची घटना घडली.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील सत्यवान बबन साबळे (वय-३२) हे पत्नीसह रविवारी (२ एप्रिल) रोजी कडा येथील आठवडी बाजार करून केरूळ गावाकडे जाण्यासाठी चौकात रिक्षाची वाट पाहत थांबले होते. यावेळी बावर गॅस एन्जसी नाव असलेला टेम्पो भरलेल्या टाक्या घेऊन केरूळ कडे चालला होता.चौकातून वळताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षाची वाट पाहणाऱ्या सत्यवानच्या अंगावरून टेम्पो गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल ५ दिवस मृत्युशी जुंझ देत शुक्रवारी (दि.७) रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पाश्यात आई,वडिल,पत्नी,दोन मुलं,भाऊ, असा परिवार आहे. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा