Advertisement

लाच घेताना महावितरणच्या दोघांना पकडले

प्रजापत्र | Wednesday, 05/04/2023
बातमी शेअर करा

माजलगाव-मीटरचे बिल अधिक येऊ नये यासाठी १३ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.५) पडकले आहे.  
   जुने मीटर बदलल्यानंतर त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्यात आले होते.यावेळी मीटरची रिडींग अधिक येऊ नये यासाठी महावितरणच्या  रामा बन्सीधर लोखंडे (वय ३८ वर्ष, कनिष्ठ लिपिक, म.रा.वि.वि. कंपनी. उपविभाग माजलगाव) व ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ (वय ३० वर्षे,कनिष्ठ सहाय्यक, माजलगाव) यांनी ४० हजारांच्या लाचेची मागणी फिर्यादीकडे केली होती.त्यानुसार तडजोडीअंती १३ हजारांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना पकडले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे आदींनी केली आहे.

Advertisement

Advertisement