परळी - येथील सिमेंट फॅक्ट्रीमध्ये सिमंटचे सॅम्पल घेण्याचे काम करणार्या कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवार दि.4 एप्रिल रोजी घडली.
परळी शहरातील गणेशपार भागातील नारायण संभाजी फड हे गत दोन वर्षांपासुन सिमेंट फॅक्ट्रीमध्ये सिमेंट सॅम्पल घेण्याचे काम करतात.परळीतील या सिमेंट फॅक्ट्रीत 130 फुट उंचीवर जाऊन हे काम करावे लागते.नारायण हे नेहमीप्रमाणे सोमवारी (दि.3 एप्रिल)रात्री 10 वाजता कंपनीत कामावर गेले.परंतु सकाळी 6 वा.ते परत घरी आले नसल्याने घरातील व्यक्तींनी फोन लावला परंतु ते उचलत नव्हते.तेवढ्यात कंपनीतुन फोन आला व नारायण हे घरी आले का याची चौकशी केली.यानंतर सकाळी नातलगांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली यानंतर सायंकाळी 4 वाजता नारायण यांचा मृतदेह 130 फुट उंचीवर सिमेंट सॅम्पल घेण्याच्या जागेजवळुन बाहेर काढण्यात आला.नारायण यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगी व एक मुलगा असा परिवार असुन हा परिवार आता उघड्यावर पडला असुन याप्रकरणी त्याची पत्नी चांगुणा नारायण फड यांच्या फिर्यादीवरुन संभाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.