Advertisement

पीएम श्री योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 13 शाळांना मान्यता

प्रजापत्र | Sunday, 02/04/2023
बातमी शेअर करा

बीड - केंद्र शासनाच्या पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील 13 शाळांना मान्यता देण्यात आली. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येणार आहे. राज्य आणि केेंद्र सरकार यांच्या ंयुक्त विद्यमाने प्रत्येक शाळेला पाच वर्षात 1.88 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

 

 

केेंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने पीएमश्री योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 13 शाळांना मान्यता देण्यात आली आहे. तसे पत्र संबंधित शाळांना पाठविण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे. शाळांच्या विकासासाठी प्रत्येक पाच वर्षासाठी 1.88 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. शाळांचा विकास करण्यासाठी केंद्राने ही योजना सुरू केली. टप्प्या टप्प्याने या योजनेमध्ये शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. मराठवाडड्यातील 53 शाळांना मान्यता देण्यात आलेली आहे.
 

Advertisement

Advertisement