Advertisement

शेजुळ हल्ला प्रकरणी; आ.सोळंकेच्या ‘पीए’ला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

प्रजापत्र | Wednesday, 29/03/2023
बातमी शेअर करा

माजलगाव - येथील व्यापारी तथा भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या पी.ए. महादेव सोळंके यास काल सायंकाळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी अटक केली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

आज दुपारी 3 वाजता महादेव सोळंके यांना माजलगाव न्यायालयाने 14 दिवसाची (दि.12 एप्रिल पर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
माजलगाव शहरातील व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर दि.७ मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात शेजूळ यांनी हा हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून झाला असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आ.प्रकाश सोळंक, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह ५ ते ६ जणांविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे असून त्यांनी चौकशीसाठी महादेव सोळंके यांना केज येथे बोलावले होते. चौकशीवेळी संशय आल्याने महादेव सोळंके यांना अधिक तपासासाठी
 अटक करून माजलगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून आज माजलगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यात त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

Advertisement

Advertisement