माजलगाव - येथील शेजुळ हल्ला प्रकरणात मंगळवारी मोठी घडामोड घडली असून या प्रकरणात पोलीसांनी महादू सोळंके याला अटक केली आहे. महादू सोळंके हे आ. प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय असून स्विय सहाय्यक म्हणून काम पाहतात.
माजलगाव येथील भाजपचे कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात आ.प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. आ.सोळंके दाम्पत्याला अटकेपासून तात्पूरते संरक्षण मिळाले होते. मात्र पोलीसांनी यातील काही हल्लेखोरांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केज येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्याकडे गेला होता. कुमावत यांनी या प्रकरणात अनेकांना चौकशीसाठी नोटीसा बजावल्या होत्या. या नोटीसीने सर्वत्र खळबळ माजलेली असतांनाच मंगळवारी पोलीसांनी या प्रकरणात महादू सोळंके याला अटक केली आहे. महादू सोळंके आ.प्रकाश सोळंके यांच्या अत्यंत विश्वासातील म्हणून ओळखला जातो. यामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटनी मिळाली आहे.
बातमी शेअर करा