बीड - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि विविध प्रश्नांसाठी आम आदमी पार्टी बीडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज (दि.२७) सकाळी भूमिपुत्रांचा रुमणे मोर्चा आयोजित केला होता. यात शेकडोच्या संख्येने शेतकरी सामील झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमलेल्या शेतक-यांनी आणि आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात शेतीमालाला योग्य भाव, पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाई, वीज दरवाढ, खतांची दरवाढ, बी-बियाणांची दरवाढ, शेतीसाठी पाणी, शेती पूरक व्यवसाय वृद्धी व अनुदान याबाबतच्या मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हासंघटनमंत्री कवी. प्रा. ज्ञानेश्वर, जिल्हासचिव रामधन जमाले, शहरप्रमुख सय्यद सादिक भाई, जिल्हाउपाध्यक्ष अक्रम भाई, जिल्हा मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर, जिल्हा कोषाध्यक्ष कैलास पालीवाल, मिलिंद पाळणे, अझम खान, विनोद पाटील, देवा गुंजाळ तालुकाध्यक्ष भीमराव कुटे, तालुका संघटनमंत्री दत्ता सुरवसे, युवाजिल्हासंघटनमंत्री प्रवीण पवार, दादासाहेब सोनवणे, नागरगोजे मामा, जामकर मामा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष माननीय रंगा दादा राचुरे यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
प्रजापत्र | Monday, 27/03/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा