सध्या संपूर्ण जगभरात रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या निमित्तानं मुस्लिम धर्मीय बांधव रोजा (उपवास) ठेवत आपआपल्या परीनं या महिन्यात अल्लाहपुढे नमाज पठण करत आहेत. दररोज इफ्तारीच्या वेळी एकत्र येऊन खाद्यपदार्थांची बरीच चंगळही पाहायला मिळत आहे. पण, हे चित्र मात्र सगळीकडे एकसारखंच नाही. कारण, देशात जिथं इफ्तारीसाठी फळांच्या थाळ्या सजवल्या जात आहेत तिथं, पाकिस्तानाच मात्र नागरिकांच्या तोंडचा घास पळाला आहे.
आर्थिक संकटामुळं पिळवटून निघालेल्या पाकिस्तानात रमजान महिन्यातच वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. इथं एक डझन केळ्यांसाठी नागरिकांना 500 रुपये मोजावे लागत आहेत. तर, द्राक्षांसाठी तब्बल 1600 रुपये इतकी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. रमजानमध्ये फळांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यातही केळ्यासारखं फळ अनेकांच्याच घरी पाहायला मिळतं. पण, आता मात्र किंमती गगनाला भिडल्यामुळं पाकिस्तानच्या नागरिकांना पोट भरणंही कठीण झालं आहे.
दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर पाहून पायाखालची जमीन सरकेल....
फर्क फळंच नाही, तर दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींचे दरही पाकिस्तानमध्ये प्रचंड वेगानं वाढत आहेत. इथं कांद्यासाठी 228.28 टक्के जास्त रक्कम मोजावी लागत यआहे, तर पिठाचे दर 120.66 टक्क्यांनी वाढले आहेत. इंधनाचं म्हणावं तर, पाकिस्तानमध्ये पेट्रोल 81.17 आणि डिझेल 102.84 टक्क्यांनी महागलं आहे.