प्रवीण पोकळे
आष्टी-निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात.काल रात्री ही आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे कीर्तनात त्यांनी गौतमी पाटीलच्या तीन गाण्याला तीन लाख रुपये देतात.पण महाराजांनी पाच हजार रुपये वाढवून मागितले तर लगेच अध्यात्माच्या नावाखाली पैशांचा बाजार मांडल्याचे सांगितले जाते.आज समाजाची मानसिकता प्रचंड बदलली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे दि.२२ ते २९ मार्च या कालावधीत सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात शनिवार दि.२५ मार्च रोजी दुपारी ४ ते ६ यावेळात आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवीदास धस,भागवताचार्य .अशोक बळे महाराज,बाळासाहेब बोराडे,पत्रकार उत्तम बोडखे,शरद रेडेकर,पत्रकार प्रविण पोकळे,चेअरमन सुरेश पवार,जयदीप धुमाळ,सरपंच हिराभाऊ केरुळकर,माजी सरपंच संभाजी पोकळे,कैलास जगताप,उमेश जगताप ,राहुल जगताप,दिलीपशेठ मेहेर,नानासाहेब तवले,रविंद्र तवले आदि उपस्थित होते. इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, आपल्या भारतीय समाजात चांगल्यांना चांगले म्हणणाऱ्यांची संख्या कमी आहे.उलट वाईटांचा उदो उदो करून त्यांना मोठे,चांगले म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे.खरे कुणी मांडायचे नाही,खरे कोणी बोलायचं नाही अशी सध्याची आवस्था झालेली आहे.एक वेळ मंदिर स्वच्छ नाही राहिले तरी चालेल परंतु शाळा स्वच्छ राहिल्या पाहिजेत.परीक्षा व शाळा सुरु नसल्याने पिढी बरबाद होऊ लागली आहे हे हसण्यावारी घेऊ नका असेही ते म्हणाले.तसेच जगात सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे तिला सांभाळा वारक-यांना काहीच संरक्षण नाही ईतरांना पेन्शन योजना आहे.अशी खंत व्यक्त केली.महाराष्ट्र सध्या कुणाला डोक्यावर घेईन ते सांगता येत नाही.एका डान्सरने तरूणाईला वेड लावलं आहे.तीन लाख घेऊन,तीनच गाणे नाचती अन् तरी लोकांना ती आवडती अन् यात पण तीनशे पोरांच्या चड्ड्या फाटतात अन् काय म्हणे ही महाराष्ट्राची संस्कृती? आहे का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.