बीड - पॅन कार्ड अपटेड करण्याच्या कारणाने एका व्यापार्याला तर क्रेडीट कार्ड अपडेट करण्याचा कारण सांगून एका नौकरदाराला गंडवल्याच्या दोन घटना घडल्या असून या प्रकरणी बीड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जनार्धन वाघमारे (रा. लाव्हरी ता.केज) या व्यापार्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कॉल आला होता. त्यांनी लिंक ओपन करुन ओटीपी सांगताच त्याच्या खात्यातून २४९९९ रुपये कटले. तर दुसर्या घटनेमध्ये भारत हिरभाऊ काळे (रा. सुशी वडगाव, ता. गेवराई) या नौकरदाराला तुमच्या के्रडीट कार्ड वर प्रतिदिन ५०० रुपयाची योजना सुरु झाली आहे. ती बंद करण्यासाठी ओटीपी सांगा असा कॉल आला होता. ओटीपी सांगताच त्यांच्या खात्यातून ४९ हजार १३१ रुपये कटले. या प्रकरणी बीड सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा