Advertisement

दिल्लीमध्ये 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

प्रजापत्र | Tuesday, 21/03/2023
बातमी शेअर करा

दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून नागरिक घराबाहेर आले असल्याची माहिती आहे. भूकंपाचे हे धक्के 7.7 रिश्टर स्केल इतके होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

 

दिल्लीमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. पण आता बसलेले धक्के हे जाणवण्याइतपत तीव्र असल्याची माहिती आहे. या भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक आपापल्या घरातून बाहेर आले. रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे. दिल्लीसह तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, कझाकिस्तान या देशांनाही या भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement