आष्टी-तालुक्यात बिबट्याने घातलेला धुमाकूळ आता चिंतेचा विषय ठरू लागला असून पिसाळलेल्या बिबट्याने अखेर पारगाव जोगेश्वरीमध्ये एका महिलेला आपला शिकार बनवल्याचे रविवारी सायंकाळी समोर आले आहे.सकाळी गवत काढणाऱ्या शालन भोसले (वय-६७) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.यामध्ये त्या महिलेच्या गळ्यावर बिबट्याचे नखे लागली होती.मात्र त्या महिलेच्या पुतण्या आणि सुनेने धाडस करून बिबट्याच्या तावडीतून महिलेची सुटका केल्यानंतर आज सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
सुरेखा निळकंठ बळे (भोसले) वय ५० ही मी,महिला एकटी कापूस वेचुन घरी परतत असताना बिबटयाने सायंकाळी ६ च्या सुमारास तिला शिकार बनविले.यावेळी त्या महिलेसोबत कुणीही नसल्याने तिला ठार मारल्याची घटना समोर आली असून तिचा गळा बिबट्याने या हल्ल्यात फोडून खाल्ला असल्याचे सांगितले जात आहे. जोगेश्वरी मंदिराच्या जवळ असणाऱ्या बळे वस्तीवर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेत प्रवेशाची शक्यता