Advertisement

बनावट दूध भेसळप्रकरणी सतीश शिंदेंवर गुन्हा

प्रजापत्र | Thursday, 16/03/2023
बातमी शेअर करा

आष्टी-येथील संभाजी नगर भागातील एका रूममध्ये दुधात भेसळ करण्यासाठी लागणारे पावडर, रसायन आष्टी पोलीस आणि अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी गुरुवारी जप्त केले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाअसून ते फरार असल्याची माहिती आहे.

 

 

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आष्टीच्या संभाजी नगर भागातील पिठाची गिरणीच्या बाजुला एका खोली मध्ये बनावट दुध तयार करण्यासाठी लागणारे पावडर , रसायन याचा मोठा साठा आढळून आला आहे. दुधात भेसळ करून त्याची विक्री करण्यासाठी या पावडरचा वापर होतं असे. 132 पांढऱ्या व खाकी रंगाच्या गोण्या व पत्राचे 220 डब्बे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी जप्त केले. या कारवाईत 8 लाख 91 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी जगदंबा मिल्क ऍ़ण्ड मिल्क प्रॉडकटस चे मालक तथा राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष सतीश नागनाथ शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंदे हे फरार झाले असून नंदू मेमाणे यास पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधीकारी श्री.अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक श्री.हेमंत कदम , सपोनि श्री.विजय देशमुख, पोउपनि श्री.प्रमोद काळे, पोउपनि श्री नामदेव धनवडे , पोह श्री दत्तात्रय टकले, महीला पोलीस हवालदार स्वाती मुंडे , पोलीस अंमलदार श्री प्रविण क्षीरसागर , अमोल ढवळे, बब्रुवान वाणी, भरत गुजर , शिवप्रकाश तवले, आकाश आडागळे, सचिन पवळ , रियाज पठाण , सचिन कोळेकर , जिजा आरेकर , मर्जीना शेख व होमगार्ड पथकातील जवान व श्री .सय्यद इम्रान हाश्मी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग बीड , व श्री . शेख मुख्तार यांनी केली.

Advertisement

Advertisement