भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियाचा निरमित कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे.
कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणांमुळे दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर दौरा सोडला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला जात असताना कर्णधार पॅट कमिन्सच्या आईचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. पॅट परत येणार नाही, तो त्याच्या कुटुंबासोबत आहेत. तो कठीण परिस्थितीतून जात असल्याची माहिती प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी दिली. याचाच अर्थ मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून कायम राहील.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला. ज्यामुळे टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. इंदूरमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील एक सामना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. पॅट कमिन्सने गेल्या वर्षी ऐरोन फिंचच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटची कमान हाती घेतली होती. परंतु त्याने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
पहिला सामना - 17 मार्च, शुक्रवार, मुंबई
दुसरा सामना - 19 मार्च, रविवार, विशाखापट्टणम
तिसरा सामना - 22 मार्च, बुधवार, चेन्नई