आष्टी-पारगाव जोगेश्वरीमध्ये गवत काढत असताना रविवारी (दि.२९) सकाळी बिबट्याने हल्ला करून शालन शहाजी भोसले (वय-६७) या महिलेला तोंडात पकडत चारशे मीटर फरफटत नेले ,मात्र त्याच वेळी तिचा पुतण्या आणि सुनेने बिबट्याचा पाठीमागे धाव घेत त्याला काठीने मारल्याने त्या बिबटयाने शालन भोसले यांना शेतात सोडून पळ काढला.या हल्ल्यात शालन यांच्या गळ्याला मोठी दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.हल्ल्यानंतर आ.सुरेश धस अवघ्या ५ मिनिटात वन विभागाची पथकांसमवेत गावात डेरेदाखल झाले होते.
दरम्यान परगाव जोगेश्वरीमध्ये हल्ला करून बिबट्या पळाल्यानंतर तो वाळुंज परिसर दिसल्याचे काही शेतकऱ्यांच्या वतीने वन विभागाला सांगण्यात आले. तर आष्टीत एक नव्हे दोन बिबटे असल्याची आता शेतकऱ्यांचे म्हणणे असून वन विभागाच्या वतीने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे चिन्हे आहेत.
--------------------------------------------------
आता पारगाव जोगेश्वरीमधील महिला ठरली बिबट्याची शिकार,मानेवर नखे लागल्याने आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल