Advertisement

बिबट्याचा कहर सुरूच,पारगाव जोगेश्वरीमध्ये महिलेवर हल्ला

प्रजापत्र | Sunday, 29/11/2020
बातमी शेअर करा

आष्टी-तालुक्यात बिबटयाने घातलेला धुमाकूळ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला असून  बिबट्याचा हल्ल्यात आतापर्यंत आष्टीतील दोघांना प्राण गमवावे लागले आहेत.काल दिंडेवस्तीवरील माय-लेकरावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज सकाळी (दि.२९) पारगाव जोगेश्वरीमध्ये एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना समोर आली आहे.या हल्ल्यात सदर महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वनविभागाची पथके आणि आ.सुरेश धस घटनास्थळी पोहचत असल्याची माहिती आहे.

 


               

 शालन शहाजी भोसले (वय-६७) असे त्या महिलेचे नाव असून त्या आपल्या शेतातून गवत घेऊन जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.यामध्ये त्यांच्या गळ्याला बिबट्याचे नखे लागली असून त्यांना उपचारासाठी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी औरंगाबाद ,अमरावती ,नांदेड,बीडमधून चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीम  कामाला लागल्या असून बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 

पुण्याचे रेस्क्यू अॅनिमल पथक आष्टीत डेरेदाखल 
 औरंगाबाद ,अमरावती ,नांदेड,बीडमधील वन विभागाची पथके नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागील तीन चार दिवसांपासून प्रयत्न करत असताना त्यांना यश न आल्याने रविवारी (दि.२९)  पुण्याचे रेस्क्यू अॅनिमल पथक आष्टीत डेरेदाखल झाले आहे.

 

Advertisement

Advertisement