मुंबई - कसोटी कारकिर्दीत चेतेश्वर पुजाराच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. चेतेश्वर पुजाराने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात नोंदवला आहे. चेतेश्वर पुजाराने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि द्रविड यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा 121 चेंडूत 42 धावा करून बाद झाला. यात 3 चौकारांचा समोवश होता. पुजाराने या डावात 9 धावा करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा पूर्ण केल्या आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा खेळाडू आहे.
चेतेश्वर पुजाराने 24 सामने आणि 43 डावात ही कामगिरी केली आहे. या दरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 शतकं आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची फलंदाजी सरासरी 50 हून अधिक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावांचा टप्पा सचिनने 42, लक्ष्मणने 41, पुजाराने 43 आणइ राहुल द्रविडने 53 डावात गाठला आहे.सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. सचिनने 39 सामन्यातील 74 डावात 55 च्या रनरेटने 3,690 धावा केल्या आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मणने 29 कसोटी सामन्यात 54 डावात 49.67 च्या रनरेटने 2,434 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडने 32 कसोटी सामन्यातील 60 डावात 2143 धावा केल्या आहेत. भारताच्या चार खेळाडूंनी अशी कामगिरी केली असली तर ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना हा टप्पा गाठता आला आहे. रिकि पाँटिंग आणि मायकल क्लार्क यांनी दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंगने 54.36 च्या सरासरीने 2555 धावा केल्या आहेत. तर मायकल क्लार्कने 53.92 च्या सरासरीने 2,049 धावा केल्या आहेत.