बीड - यावर्षी बारावीची परीक्षा सुरुवातीपासूनच कुठल्या न कुठल्या कारणामुळे प्रकाश झोतात आलेली आहे. मग त्या प्रश्नपत्रिका मध्ये झालेल्या चुका असतील किंवा पेपर फुटी सारख्या काही घटना असतील.
शुक्रवारी बारावीचा गणित विषयाचा पेपर झाला मात्र पेपर सुरू होण्याअगोदरच गणित विषयाची प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर वायरल झाल्याच्या काही बातम्या माध्यमामधून येऊ लागल्या. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर गणित विषयाचा पेपर पुन्हा द्यावा लागतो की काय अशी धाकधूक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती. मात्र या प्रकरणावर शिक्षण मंडळाने पडदा टाकला असून विद्यार्थी हे सकाळी साडेदहा त्या अडीच दरम्यान परीक्षा दालनामध्ये असतात. साडेदहाच्या नंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे बाहेर समाज माध्यमावर प्रश्न पत्रिका जरी आलेली असली तरी ती विद्यार्थ्यांपर्यंत कुठेही पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणित विषयाचा पेपर पुन्हा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जारी केला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती होती ती दूर झाल्याचे या परिपत्रकावरून दिसत आहे.
मात्र सदरील प्रकरणी ज्या ठिकाणाहून हा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या त्या सिंदखेड राजा येथे पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकाराबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून नेमका पेपर कोणी फोडला ? याचा तपास पोलीस करत आहेत. अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रजापत्र | Saturday, 04/03/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा